कर्नाटकात सत्तेवर येताच सिद्धारमैया सरकार महिलांसाठी मोफत बस सेवा म्हणजेच ‘शक्ती योजना’ सुरु केली. या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस महिला आमदार रूपकाला यांनी महिलांमध्ये मोफत बस पास वाटले. एवढंच नव्हे तर त्यांनी चक्क ड्रायव्हर सीटवर बसून बस चालवणार असल्याचे सुद्धा सांगितले. दरम्यान या सगळ्या प्रयोगात त्यांच्याकडून एक चूक घडलीच आणि आता त्याचा फटका अनेकांना बसला आहे.
सदर घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे ज्यामध्ये रूपकला या ड्रायव्हरच्या मदतीने बस चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, यावेळी बसमध्ये अनेक महिला प्रवासी सुद्धा बसलेल्या आहेत. जेव्हा बस चालवण्याची वेळ येते तेव्हा रूपकला यांनी चुकून रिव्हर्स गिअर टाकला आणि यामुळे बसच्या मागे उभ्या अनेक गाड्या कोलमडून पडल्या. यानंतर मग ड्रायव्हरने स्वतः स्टेअरिंग हातात घेतले.हा प्रकार व्हायरल होताच अनेकांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले आहेत. “परवाना नसताना या आमदार बाईंना गाडी चालवण्याची मुभा कशी काय दिली?” “काँग्रेसची ही सवयच आहे, फायद्यातही नुकसान करणारच”अशा पद्धतीच्या कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.
Photo-op gone wrong#Karnataka : During the launch of free bus ride for women scheme, #Congress MLA Rupkala herself drove the bus.
She put the bus in the reverse gear and the bus rammed into parked vehicles.@BlrCityPolice @CPBlr, any fine for driving bus without licence? pic.twitter.com/3x0PqeEf4l
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) June 12, 2023