सिंह हा केवळ जंगलाचा राजाच नाही तर सर्वात भयानक शिकारीही आहे. सिंह जर कोणाला घाबरत असेल तर ती म्हणजे सिंहीण. आजवर अनेक व्हायरल व्हिडीओजमध्ये सिंहिणीचा जंगलातील दबदबा दिसून आला आहे. आता नव्या व्हायरल व्हिडिओमध्ये सुद्धा सिंहीण भडकल्याचे दिसून येत आहे, आणि तिचे भडकण्याचे कारण सुद्धा अगदी एखाद्या माणसाप्रमाणेच आहे. तुम्ही हे वाक्य सिनेमांमध्ये ऐकले असेल ना, “एक बाई आपलं सगळं काही शेअर करू शकते पण आपला नवरा कधीच शेअर करू शकत नाही.” या व्हिडिओमध्ये हेच वाक्य प्रत्यक्ष सिंहिणीच्या कृतीमधून पाहायला मिळतेय.
कॅप्शननुसार साऊथ आफ्रिकेतील जंगल सफारी दरम्यानचा हा व्हिडीओ असावा, ज्यात एक महिला सिंह व सिंहिणीच्या अगदी जवळ उभी दिसतेय. अन्य भारतीय पर्यटक या महिलेला पुढे येऊन सिंहाला हात लावण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. घाबरून ही महिला पुढे येते, स्पर्श करते पण तितक्यात सिंहिणीला असा काही राग येतो की ती थेट उभी राहून महिलेकडे आक्रमक नजरेने पाहू लागते. हे पाहून महिलेची अशी काही घाबरगुंडी उडते की आता कुठे पळावं हे सुद्धा तिच्या चटकन लक्षात येत नाही.
random Indian uncles in South Africa helping my mom 😂>>> pic.twitter.com/NtFAwOYD5r
— R🖤 (@findgoddd) June 1, 2023