मासे पकडण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड,काही मिनिटांमध्ये मिळवले बादलीभर मासे

0
40

मासेमारी करणे हे जगातील सर्वात अवघड कामांपैकी एक आहे. लांबून पाहणाऱ्याला हे काम खूप सोप्पं आहे असं वाटत असतं. त्यात नदीमध्ये मासे पकडणं बरंच कंटाळवाणं असतं. आपल्याकडे मासेमारी करण्यासाठी मोठमोठ्या जाळ्यांचा वापर केला जातो. परदेशी मासेमारी हा छंद म्हणून जोपासला जातो. तेथे लोक फिशिंग रॉड घेऊन मासे पकडायला जातात. गळाचा खादय लावून मासे गळाला लागेपर्यंत वाट पाहणं थकवणारं असतं. व्हायरल व्हिडीओमधील या तरुणाने मासे पकडणं किती सोप्प काम आहे हे दाखवून दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये तरुण नदीच्या किनाऱ्याजवळ हातामध्ये छोटी बादली हातामध्ये घेऊन उभा असल्याचे दिसते. किनाऱ्याजवळच्या जमिनीला उतार असल्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्यासह मासे देखील वाहत येत आहेत आणि काही सेकंदांसाठी हवेत उडत आहेत. ही गोष्ट त्या तरुणाने ओळखली आणि तो त्या ठिकाणी छोटी बादली घेऊन उभा राहिला. असे केल्याने पाण्यातले मासे सलग बादलीमध्ये जात आहेत असे पाहायला मिळते. आपल्या बुद्धीचा वापर करुन त्या हुशार तरुणाने पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सिद्ध केले आहे.