एका धबधब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. एका तरुणानं उंच टोकावर जाऊन बोटीनं पाण्यात जीवघेणा खेळ केला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, धबधब्याच्या ठिकाणी वेगात असलेल्या पाण्यासोबत राफ्टिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. उंच असलेल्या टेकडीवरुन खाली पाणी पडतं आहे. तिथं कोणलाही भीती वाटेल, परंतु राफ्टिंग करणाऱ्या लोकांना अजिबात भीती नसल्याचं त्या व्हिडीओतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती पाण्याच्या वेगाने खाली पाण्यात पडली आहे. काहीवेळ ती व्यक्ती गायब झाली असं वाटतंय, परंतु काही वेळाने ती व्यक्ती धबधब्याच्या खालच्या बाजूला दिसून येत आहे. या व्यक्तीचा कमबॅक पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
This is a bravery and skill combined pic.twitter.com/YtYw4Rqujy
— Mind Expanding (@MindExpanding1) August 15, 2023