व्हिडिओ शेअर करत सचिनने लिहिलंय की, पिनिनफॅरिना बॅटिस्टा कडे “ईव्ही हे भविष्य आहे का?” याचे हे अचूक उत्तर होते. हा प्रवास खूप जलद होता. आम्ही थेट भविष्यातंच उतरलो… आनंद महिंद्रा आणि त्यांच्या टीमने खूप चांगली उपलब्धी मिळवली आहे. एक अद्भुत कामगिरी केली आहे.”
सचिन तेंडुलकर याने प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका अत्याधुनिक इलेक्ट्रिक गाडीमधून प्रवास केला आहे. हा प्रवास केल्यानंतर सचिन खूप खूश दिसत होता. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.