Monday, May 20, 2024

आजा मेरी गाडी में बैठ जा…खा.विखेंचे आमंत्रण राष्ट्रवादीच्या माजी आमदारांनी लगेच स्विकारले!

आजा मेरी गाडी में बैठ जा…….

सत्ताधारी आणि विरोधक एकाच गाडीत…..

कोणती “डाळ” शिजतेयं विखेंच्या या गाडीत?

mp sujay vikhe patil श्रीगोंदा (सुजित गायकवाड): खासदार डॉ सुजय विखे यांनी बेलवंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही पक्ष पलटी मारतो या वक्तव्यांनंतर जिल्ह्यातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विखेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार कमालीचे प्रभावित झाल्याचे दिसून आले, कार्यक्रम आटोपल्या नंतर खासदार डॉ सुजय विखे यांनी राहुल जगताप यांना ‘आजा मेरी गाडी मे बैठ जा ‘ असे म्हणताच माजी आमदार राहुल जगताप यांनी एकाच गाडीत प्रवास करत श्रीगोंदा येथील एका हॉटेल च्या कार्यक्रमाला उपस्थित राहत पुन्हा एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल जगताप यांनी खासदार सुजय विखे यांच्या गाडीत नेमकी कोणती “डाळ” शिजवली या बाबत तर्कवतर्क लढविले जात आहेत.राहुल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाराज तर नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान कार्यक्रमात विखे यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांना सर्वपक्षीय नेता संबोधत त्यांनी प्रथम आपला पक्ष आणि आपले चिन्ह जाहीर करावे त्यानंतर त्यांना किती प्रमाणात निधी द्यायचा हे ठरवणार असल्याचे सांगून आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी देखील केली.दरम्यान डॉ.सुजय विखे यांना राहुल जगताप यांच्यासोबत एकत्र प्रवासादरम्यान झालेल्या राजकीय खलबतांबाबत विचारले असता आपण केवळ कारखान्याच्या उसा संदर्भात चर्चा केली असून राहुल जगताप राष्ट्रवादीत खुश असल्याची प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles