सभापती राम शिंदे सत्कार सोहळ्याला भाजपच्या आमदारांचीच अनुपस्थिती आ. कर्डिले,पाचपुते म्हणाले….

0
30

अहिल्यानगर : पक्षाच्या महामेळाव्याचे नियोजन करण्यासाठी शिर्डीतील बैठकीला जावं लागल्याने राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नसल्याचा सूर आता भाजपच्या आमदारांनी लावला आहे. पण आता ही कसर भरून काढू आणि महायुतीच्या वतीने राम शिंदे यांचा सत्कार करू असं आमदार विक्रम पाचपुते यांनी जाहीर केलं.विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरात शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्या सत्कार सोहळ्याला भाजपच्याच नेत्यांचीच अनुपस्थित असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

याबाबत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. शिर्डी येथे भाजपच्या होणाऱ्या महामेळाव्याच्या नियोजन बैठकीसाठी जावे लागल्याने शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला येता आलं नाही असं कर्डिले यांनी सांगितलं. तर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आपण खासगी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी असल्याने सत्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही असं सांगितलं. मात्र ही कसर भरून काढू आणि महायुतीच्या वतीने शिंदेंचा स्वतंत्र सत्कार सोहळा आयोजित केला जाईल असं त्यांनी सांगितलं.