मुंबई : भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतले का? असा सवाल मेटेंनी केला.
मेटे म्हणाले, आम्ही प्रामाणिकपणे भाजपच्या सोबत आहोत, असे असताना आम्हाला शब्द देऊन सुद्धा उमेदवारी दिली नाही. विधान परिषदेवर तुम्हाला आम्ही शंभर टक्के उमेदवारी देणार असे सांगितले होते. मित्रपक्षांना सोबत घेऊन त्यांचा उपयोग झाला की मध्येच टाकून द्यायचे असी तर काही निती भाजपची नाही ना, असा सवाल मेटे यांनी उपस्थित केला. भाजपच्या सत्तेच्या काळात सुद्धा मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, असेही मेटे म्हणाले.






