Viral Video सध्या एका भारतीय महिलेच्या कौशल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला शेणाच्या गौऱ्या अशाप्रकारे हवेत फेकून भिंतीवर चिकटवते की ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक भारतीय महिला भिंतीवर शेणाच्या गौऱ्या लावताना दिसत आहे. ती ज्या प्रकारे शेणाच्या गौऱ्या हवेत भिंतीवर फेकते आहे ते पाहून कोणाचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. महिलेचे टार्गेट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बाई अगदी नेमक्या पद्धतीने शेणाच्या गौऱ्या टाकत असल्याचे तुम्ही बघू शकता. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Indian basket ball team is searching for her. pic.twitter.com/hE2dBy7nAu
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 29, 2022






