धावत्या मालगाडीवर दोन तरुणांचा जीवघेणा स्टंट, फक्त एक चूक अन्…व्हिडीओ

0
26

सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही स्टंट फसलेले दिसतात तर काही थक्क करून जातात. मात्र, तरीही लोक यातून धडा घेत नाहीत. आजकाल प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं हटके करण्याच्या प्रयत्न युवा पिढी करताना दिसते. यामध्ये अनेक मजेशीर गोष्टीपासून ते धोकादायक स्टंटपर्यंत सर्वकाही केलं जातं. आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट पाहिले असतील. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुणांनी चक्क मालगाडीवर स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुण धावत्या मालगाडीवर फिल्मी स्टाइल स्टंट करताना दिसून आले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन तरुण शर्टशिवाय जीवाची पर्वा न करता स्टंट करत आहेत. या व्हिडीओ ग्रेटर नोयडाचं असल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ काही क्षणाच्या प्रसिद्धीसाठी तरुण हल्ली अशाप्रकारे स्टंटबाजी करताना दिसतात.