इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ @jaanshine112233 वर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण नोटांचा ‘पाऊस’ पाहून लोकांची चांगली मजा झाली. हा व्हिडीओ पाहून यूजर्सही हैराण झाले आहेत.
व्हिडिओत रस्त्यावर वरात जाताना दिसत आहे. वरातीमधील काही लोक हवेत नोटा फेकत आहेत आणि इतर लोक पैसे गोळा करत आहेत. नीट बघितलं तर बाजूला उभे असलेले काही तरूण हवेत पैसे फेकताना दिसत आहेत. या नोटा १०-२० रूपयांच्या असल्याचं दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ८६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे. एकानं लिहिलं की, ‘जर इतका पैसा आहे, तर गरीबांमध्ये वाटला पाहिजे. असेच उडवण्यात काय अर्थ आहे’. तर दुसऱ्यानं लिहिलं की, ‘१० रूपयांची नोटा उडवून स्वत:ला श्रीमंत समजत आहे’.






