जंगलातील रस्त्यावर हत्तीची अनोखी ‘कर’ वसुली… Viral Video

0
2430

व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलाच्या मध्यभागी एक रस्ता जात असल्याचे दिसून येत आहे. ज्या रस्त्यामध्ये ऊसाचा माल घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा आहे, तर दोन हत्ती ट्रकच्या समोर उभे आहेत. जेव्हा ट्रकवरचा माणूस ऊसाचा ढिगारा रस्त्याशेजारी फेकतो, ते पाहून हत्ती त्या दिशेने धावतात आणि मग रस्ता ट्रक पुढे जाण्यासाठी मोकळा होतो. जोपर्यंत ते ऊस देत नाहीत, तोपर्यंत हत्ती मार्ग सोडत नाहीत. आईएफएस अधिकारी परवीन यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, शेवटी तुम्ही या टॅक्सला काय म्हणाल?