Viral Video….हौसेने आणली इंजिनिअर सूनबाई, तिच्या स्वयंपाकाचा सासूबाईला ताप !

0
1361

Viral Video इंस्टाग्रामवरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक सासू तिच्या सुनेसोबत स्वयंपाकघरात दिसत आहे. पण पुढच्या व्हिडीओमध्ये जे घडलं ते पाहून तुम्हाला हसू येईल.

खरतर एका मुलाने इंजिनिअर मुलीशी लग्न केले आहे. लग्नानंतर मुलीचा स्वयंपाकघरात पहिला दिवस असतो. सासू सुनेला जेवण बनवायला सांगते. इंजिनिअर सुनेची स्वयंपाकाची स्टाईल पाहून सासूही थक्क होते. सून इतकी मॉडर्न निघाते की तिला एक चपातीही बनवता येत नाही. प्रथम ती तव्यावर असलेल्या चपातीला बेलण्याने भाजते. सासू तिला अडवते आणि तिला हाताने चपाती भाजायला सांगते. मग सासू तिला तव्यावरची चपाती पलटायला सांगते, मग इंजिनिअर सून तव्यावरून चपाती गॅसवर ठेवते.