Viral Video Girl….लहानगीचा धडकी भरवणारा स्टंट

0
1108

Viral Video Girl
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जमिनीपासून शेकडो फूट उंचावर दोरी आणि लाकडी फळ्यांच्या मदतीने तयार केलेला एक पूल दिसून येतोय. या पूलावरून ही लहान मुलगी चालत येताना दिसून येतेय. हा स्टंट पाहिल्यानंतर कुणीही आपला श्वास रोखून धरेल. या पूलावरील फळ्यांमध्ये भरपूर अंतर आहे. तरी सुद्धा ही चिमुकली बाजुच्या दोरीवर आपले पाय ठेवत ठेवत मग फळ्यांवर येताना दिसतेय. ज्यावेळी ही मुलगी जास्त अंतर असलेल्या फळ्यांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते ते पाहून तर मनात अगदी धडकी भरू लागते. या मुलीचा एक पाय जरी चुकीच्या जागेवर पडला किंवा घसरला तर या मुलीचं काय होईल, असा विचार मनात येऊ लागतो. पण ही मुलगी मोठ्या हुशारीने हा पूल पार करते.

काही नेटकऱ्यांनी असा स्टंट न करण्याचं आवाहन केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मुलीच्या पालकावर आपला संताप व्यक्त केलाय.