दिवाळीच्या साफसफाईची भारीच हौस..थेट चौथ्या मजल्यावर महिलेची कसरत..व्हिडिओ

0
594

दिवाळीच्या काळाच सोशल मिडीयावर साफसफाईवरुन अनेकदा मिम्स आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळेस ते इतके ट्रोल होतात की, आपल्या घरातील लोकही त्याप्रमाणेच वागू लागतात.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात एक महिला तिच्या घराच्या खिडक्या साफ करताना दिसत आहे. बरं, हे सामान्य वाटेल पण तो सामान्य साफसफाईचा फोटो नाही, ती महिला खिडकीच्या बाहेर चढली आणि साफसफाई करु लागली. त्यातच तिने चौथ्या मजल्यावर असल्याचे दिसून आले.

ती महिला कोणत्याही आधाराशिवाय बाहेर चढताना सहजतेने खिडकी साफ करताना दिसते. ती खिडकीच्या काठावर उभी राहिली आणि कापडाचा वापर करून काचेचे फलक मारताना दिसली. या व्हिडिओने नेटिझन्सला आश्चर्यचकित केले आहे