सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एक लग्नाचा व्हिडीओवर खूपच मजेशीर प्रतिक्रीया आहेत. या व्हिडीओला खूपच लाईक्स मिळाल्या आहेत. यात नवरा आणि नवरी डान्स करून रिसेप्शन सदृश्य समारंभासाठी ऐटीत सामोरे जात असताना एक गडबड होते. नवरा आपल्या नवरीला घेऊन पाहुण्यांना सोमोरे जात असतानाच एक बुजुर्ग माणूस नवऱ्याची दृष्ट काढण्यासाठी खिशातून एक नोट काढून आपल्या जिभेला चिकटवून तिच नोट नवऱ्याच्या कपाळाला लावतो आणि नवराचं डोकं सटकतं…मग पुढे काय होतं ते खरं तर प्रत्यक्ष व्हिडीओत पाहा…
नवऱ्याच्या कपाळाला लावलेली ती नोट खाली सुदैवाने पडते परंतू तो इसम पुन्हा ती नोट उचलून नवऱ्याच्या कपाळाला लावायला जातो आणि एवढा वेळ राखून ठेवलेला नवऱ्याचा संयम सुटतो. आणि नवरा लग्न वगैरे विसरून सरळ लाथेने त्या पाहुण्याला उडवतो. आणि लग्नमंडपात फ्री स्टाईल कुस्ती सुरू होते.