व्हिडीओ janu9793 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. या महिलेनं ही ट्रिक नेमकी केली कशी? हे तर देवच जाणो, पण पाहताना मात्र भन्नाट वाटतेय. तर तिनं सर्वात आधी कणिक छान मळून घेतलं. मग तिनं पिठाचा एक गोळा घेतला अन् त्यामध्ये ५०० रुपयांची नोट ठेवली. मग त्या ५०० रुपयांच्या गोळ्याला छान लाटून चपाती तयार केली. मग ही चपाती लोणी वगैरे लावून तव्यावर भाजून काढली. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की त्या ५०० रुपयांच्या नोटेचं काय झालं? तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पाचशे रुपयांचं २ हजार रुपयांच्या नोटेत रुपांतर झालं. हा व्हिडीओ आतापर्यंत ७५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अन् सर्वांना एकच प्रश्न पडलाय खरंच चपातीमधून पैसे चौपट वाढतात का?
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल चपाती लाटताना ५०० ची नोट टाकली, भाजल्यावर निघाली २ हजारांची नोट… अनोखा...