लग्नाचे अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर कपड्यांना आग लाऊन फोटोशूट करताना दिसत आहे.
स्टंट कपल गॅबे जेसॉप आणि अम्बीर बेबीर, दोघेही त्यांच्या लग्नात स्टंट करताना दिसत आहेत. आपल्या लग्नाच्या दिवशीही काहीतरी हटके करण्याचा विचार केला, जे पाहून पाहुणे स्तब्ध होतील.
या व्हिडीओला टिकटॉकवर १५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हाच व्हिडीओ इंस्टाग्रामवरही पोस्ट करण्यात आला आहे.
विशेष सूचना: असा स्टंट किंवा फोटो शूट करणे नक्कीच टाळा.