देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक लूक चर्चेत आहे, ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींसारखा दिसणाऱ्या या डुप्लिकेटचं नाव अनिल ठक्कर असं आहे. ते अहमदाबादमध्ये पाणी पुरी विकण्याचं काम करतात. त्यांचा साईड फेस आणि गेटअप पंतप्रधान मोदींसारखाच आहे, त्यामुळे लोक त्यांना फक्त मोदी या नावाने ओळखतात. ते म्हणतात की, त्यांच्यात आणि पंतप्रधानांमध्ये फारसा फरक नाही, कारण मोदीजी चायवाला होते आणि मी पाणीपुरी वाला. वयाच्या 15व्या वर्षापासून पाणीपुरी विकत असल्याचे अनिल ठक्कर यांनी सांगितले. जेव्हा त्यांनी या कामाची सुरुवात केली तेव्हा ते फक्त 25 पैशांत लोकांना पाणीपुरी खाऊ घालायचे.
पंतप्रधान मोदींच्या डुप्लिकेटचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर eatinvadodara नावावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, ‘मोदीजींचा डुप्लिकेट पाणीपुरी विकत आहे.’