माणसानं निर्माण केलेल्या रोबोवर माणसाचेच नियंत्रण सुटले तर काय होईल हे रजनीकांत यांच्या रोबो चित्रपटात आपण पाहिलं आहे. तो चित्रपट असला तरी खर्या आयुष्यातही असे प्रकार घडू शकतात.
ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक रोबो एस्केलेटरच्या (सरकते जिने) बाजूला थांबून ये-जा करणाऱ्यांचे तापमान मोजत असतो. पायऱ्यांवरून खाली उतरताना एक तरुण त्याच्याशी थट्टा करतो. तापमान मोजण्याऐवजी तो तरुण त्याला लाथ मारतो. रोबो हे मशीन असल्याने त्याला भावना नाहीत त्यामुळे काहीच प्रतिक्रिया मिळणार नाही, असा समज त्या तरुणाचा असतो; पण लाथ मारून पुढे जाताच रोबोही त्याला बदडण्यासाठी त्याचा मागे धावू लागतो. आजूबाजूला असलेले दोन रोबोही तिथे तत्काळ पोहोचतात आणि तिघे मिळून त्या तरुणाची चांगलीच धुलाई करतात. त्या तीन रोबोच्या हातात वेगवेगळ्या प्रकारची हत्यारंही दिसत आहेत.
Robots will not tolerate disrespectful people😂
— Tansu YEĞEN (@TansuYegen) August 4, 2022