सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही वधू-वर मंडपात बसलेले पाहू शकता. या दरम्यान एक विधी केला जातो, ज्यामध्ये वधू-वर असे दोन्ही बाजूचे दोन लोक पांढरी चादर घेऊन त्यावर तांदूळ टाकतात आणि तीन वेळा वर फेकतात.
तिसऱ्यांदा तांदूळ हवेत फेकताच ते दोन्ही बाजूंनी चादर ओढायला सुरुवात करतात. या घटनेत डाव्या बाजूची व्यक्ती त्या चादरीसहित वधू वराच्या अंगावर जाऊन पडते. वधू वर जमिनीवर आडवे होतात, बघून खूप हसू येईल.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे लग्नमंडपात विधी पार पाडण्याच्या प्रक्रियेत तो तरुण इतका गुंतलेला आहे की त्याला वधू-वर पडल्यावरसुद्धा काही एक फरक पडत नाही. वधू-वर बराच वेळ जमिनीवर पडले.