Video : लाकडापासून तयार केली सुदंर ‘हाऊस बोट’,किंमत ऐकून व्हाल थक्क..

0
37

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ काश्मीरचा आहे. महिला काश्मीरमध्ये पाण्यात, बोटीचा आनंद लुटताना दिसत आहे.व्हिडीओत तुम्ही बघू शकता की,हस्तकले पासून बनलेल्या काही गोष्टी विकण्यासाठी एक व्यापारी बोटीतून येतो.आणि महिलेला एक एक करून खूप सुंदर अशा वस्तू दाखवतो. सगळ्यात आधी लाकडाच्या बोटीवर एक सुंदर घर बनवण्यात आले आहे ते दाखवतो. त्यानंतर बिअर पिण्यासाठी एक लाकडाचा ग्लास बनवण्यात आला आहे तो महिलेला दाखवतो. त्यानंतर लाकडापासून तयार केलेलं अनेक किचेन्स सुद्धा दाखवतो. त्यानंतर शहामृगाच्या आकाराचे एक शो पीस दाखवतो जे लाकडापासून बनलेलं आहे आणि ते कधीच काळं सुद्धा होणार नाही असे त्याचे खास वैशिष्टसुद्धा सांगतो. तसेच एक फोल्डिंगचे घड्याळ दाखवतो जे घडी घालून आपण एका बॉक्समध्ये ठेवू शकतो. त्यानंतर सूर्यफुलाच्या आकाराचं एक घड्याळ दाखवतो त्याच्या नक्षीकाम केलेल्या पानांना आपण घडीही घालू शकतो.या सुंदर हस्तकलेची एक झलक तुम्हीसुद्धा बघाच