Virat Kohli….भर मैदानात विराट कोणाच्या पाया पडला? Video

0
41

Virat Kohli रागीट आणि तापट स्वभावाच्या विराट कोहली याचं दुसरं रुप क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. विराट कोहली याची ही दुसरं रुप पाहून चाहत्यांना ही धक्काच बसलाय. गौतम गंभीर याच्यासोबत राडा घालणारा विराट कोहली चक्क पाया पडलाय. विराट कोहली याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

विराटने दिल्ली विरुद्ध आरसीबी या सामन्याआधी विराट कोहली सरावासाठी मैदानात उतरला. यावेळेस विराट कोहलीचे लहाणपणीचे कोच राजकुमार शर्मा हे मैदानात हजर होते. राजकुमार शर्मा यांना पाहताच विराट त्यांच्या दिशेने चालत गेला आणि सर्वात आधी त्यांच्या पाया पडला. विराटने पाया पडल्यानंतर राजकुमार शर्मा यांना घट्ट मीठी मारली.