विराटला बर्थडे सरप्राईझ द्यायला गेली अनुष्का शर्मा, अशी फजिती झाली Video

    0
    1800

    अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांबद्दलचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 5 नोव्हेंबरला विराटच्या वाढदिवशीमिसेस कोहली म्हणजेच अनुष्का शर्माने एक सुंदर पोस्ट करून कोहलीचे घरातील खेळकर रूप दाखवले होते. यांनतर अनुष्काने आज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आणखी एक खास व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का विराटसाठी सरप्राईज प्लॅन करताना दिसत आहे, मात्र तिची चांगलीच काही फजिती होते. व्हिडिओच्या शेवटी कोहलीला झाडू घेऊन दिसत आहे. चला तर विराट कोहलीच्या वाढदिवसाला असं नेमकं काय घडलं हे पाहुयात..

    अनुष्का शर्माने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती रात्री १२ वाजता विराट कोहलीला सरप्राईज देण्यासाठी केक घेऊन येते पण चमचा घेण्यासाठी ड्रॉवर उघडायला जाताच ते जाम झालेले असते आणि ड्रॉवरची कडी खेचताना ती केकसकट जमिनीवर पडते. या आवाजाने कोहलीला जाग येते आणि चोर समजून तो त्याला मारायला झाडू घेऊन किचनमध्ये येतो. खरंतर ही एका ब्रँडसाठी केलेली जाहिरात आहे मात्र यातही विराट – अनुष्काची अगदी गोड केमिस्ट्री दिसून येत आहे.