बाईपण भारी देवा! महिलेने पावसाच्या पाण्याचा केला पुरेपूर वापर, भन्नाट जुगाडाचा Video

0
47

अनेकदा बाहेर मुसळधार पाऊस पडत असला तरीही घरात वापरण्यासाठी पाणी उपलब्ध नसतं. पावसामुळे वीज जाते किंवा इतर अनेक कारणांमुळे पाणीपुरवठा खंडीत होतो. अशावेळी पाणी आणायचं कुठून असा प्रश्न महिलांना सतावत असतो. पण एका महिलेने आता पावसाच्या पाण्याचा वापर अशा पद्धतीने केला आहे. जो पाहून अनेकांनी तिचं कौतुकं केलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने घराच्या बाल्कनीत एक जुनी छत्री अडकवल्याचं दिसत आहे. तर या छत्रीला पुढे पाण्याची बॉटल जोडल्याचं दिसत आहे. या बॉटलला एक पाईप जोडली आहे ती थेट बाथरुममध्ये नेण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पावसाचं पाणी जुगाड करुन थेट बाथरुममध्ये नेल्याचं दिसत आहे. शिवाय या पाण्याचा वापर करुन ही महिला कपडे धुत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे.एका महिलेचा अप्रतिम जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे