लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. अनेकदा लग्नात नवरी रडताना आपण अनेकदा पाहिले असेल; पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क नवरदेव भरमांडवात रडताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, नवरी दिसताच नवरदेव रडायला लागतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेव उभा असतो. अचानक नवरी स्टेजकडे येताना दिसते. प्रेयसी आता बायको होणार, हे पाहून त्याला आनंद होतो. प्रेयसीला नवरीसारखे नटलेले पाहून तो चक्क रडायला लागतो. तेव्हा नवरी त्याला इशाऱ्याने रडू नको, असे सांगते. पुढे नवरी स्टेजवर येते आणि हातातील पुष्पगुच्छ नवरदेवाला देते. नवरदेव प्रेमाने नवरीला मिठीच मारतो. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल नवरीला पाहताच भरमांडवात नवरदेव ढसाढसा रडायला लागला, पाहा व्हिडीओ …