लग्नासाठी नवरोबाचा नादच खुळा…मुसळधार पावसाचीही तमा नाही बाळगली…व्हिडिओ

0
31

अनेकदा लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्या पाहून काय बोलावं हेच कळत नाही. आता हाच व्हिडीओ पाहा ना. या पठ्ठ्यानं तर काहीही करून लग्न पूर्ण झाल्याशिवाय मंडपातून बाहेर पडायचं नाही असा जणू निश्चयच केला आहे. कारण वादळी वारा आणि मुसळधार पावसाला न जुमानता हा नवरदेव चक्क लग्न करतोय. ज्या अग्नीभोवती सात फेरे घेतले जातात तो सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यानं विझला आहे. पण त्या विझलेल्या होमाभोवतीच हा नवरदेव आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन फेऱ्या मारत आहे. बरं, ती पडू नये तिच्या महिलेनं पकडलं सुद्धा आहे.