फोटो साठी नववधूने दिली भयानक पोझ…सगळेच झाले हैराण.. व्हिडिओ

0
38

विवाहसोहळ्यातील वधू-वरांसाठी सर्वात खास क्षण म्हणजे जेव्हा ते एकमेकांना हार घालतात. यादरम्यान, अनेक फोटो क्लिक केली जातात, ज्यामुळे हा क्षण आयुष्यभर संस्मरणीय बनतो. लोक हे फोटो आपल्या घरात फ्रेम करून ठेवतात, पण या व्हिडीओत जे दिसत आहे. ते आपल्या घरी लावण्याची हिंमत कोणीच करणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू आणि वर एकमेकांना हार घालण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. प्रथम वधू वराला हार घालते आणि नंतर वर वधूच्या गळ्यात हार घालते. परंतू हे सर्व करत असताना नववधूचे एक्सप्रेशन कोणालाही घाबरवतील असेच आहे. नववधू न हसता अगदी मोठे डोळे आणि गंभीर चेहरा करुन फोटो काढत आहे. तिचे एक्सप्रेशन आणि ही स्टाईल पाहून कॅमेरामॅन देखील घाबरला असावा.