Whatsapp आपल्या यूजर्सना देणार नवीन फिचर्स..वाचा सविस्तर…

0
312

Whatsapp आपल्या यूजर्सना नवीन फिचर्स (Features) देणार आहे. या फिचर्समुळे युजर्स आता ग्रुप व्हॉईस कॉलवर अधिक लोकांना जोडू शकतील आणि मोठ्या फाईल्स दुसर्‍या व्हॉट्सअ‍ॅप युजर्संना सहजतेने पाठवू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपने गुरुवारी जाहीर केले की, ३२ लोकांना ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये सहभागी होण्याची आणि दोन जीबीपर्यंतच्या फाइल्स शेअर करण्याची परवानगी देईल. याशिवाय Whatsappने आणखी अनेक नवीन फिचर्स देण्याची घोषणा केली आहे. सध्या मोबाईल अ‍ॅप वापरून ग्रुप व्हॉईस कॉलमध्ये फक्त आठ लोकांना जोडता येते. तसेच युजर्स एक जीबीपेक्षा जास्त फाइल इतर कोणत्याही युजर्सला शेअर करू शकत नव्हते.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट ग्रुपच्या अ‍ॅडमिनला कधीही मेसेज डिलीट करण्याची परवानगी देईल. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, डिलीट केलेले चॅट ग्रुपमधील कोणत्याही सदस्याला दिसणार नाही. मेटा प्लॅटफॉर्मचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही Whatsappवरील ग्रुप्समध्ये फीडबॅक, मोठ्या फाइल शेअरिंग आणि मोठ्या ग्रुप कॉलसह नवीन वैशिष्ट्ये देत आहोत.”