JCB चा रंग पिवळाच का असतो? या मागे आहे महत्त्वाचे कारण

0
27

JCB. अवजड सामान उचलण्यापासून मोठे खड्डे खणण्यापर्यंत जेसीबीचा वापर केला जातो. जेसीबी आल्यापासून सगळी कामं सोपी झाली आहेत. जेसीबी वाहन अगदीच लोकप्रिय आहे. एखाद्या ठिकाणी जेसीबीचं काम सुरू झालं, तर ते पाहायला लोक जात असतात. पण, जगभरात वापरल्या जाणाऱ्या या जेसीबी मशीनचा रंग पिवळाच का असतो. तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? आपण इतर काही मशीन्स बघितल्या, तर आपल्याला लक्षात येईल की, त्यांत वेगवेगळे रंगही असतात. पण, जेसीबीला फक्त पिवळाच रंग का दिला जातो?

जेसीबीनं १९४५ नंतर वेळोवेळी नवनवीन मशीनचं उत्पादन केलं आणि अनेक बदल केले.

कंपनीनं प्रथम तयार केलेल्या बॅकहो लोडरला निळा व लाल रंग दिला होता. परंतु, कालांतरानं या रंगात बदल करून पिवळा रंग देण्यात आला.

जेसीबीचा पिवळा रंग असण्यामागे एक विशेष कारण आहे. जेसीबीला पिवळा रंग देण्यामागे सुरक्षितता आहे. बांधकामाच्या ठिकाणी काम सुरू असताना लांबून, अंधारात, धुक्यात किंवा धूळ, माती असताना, रस्त्यावर काम सुरू असतानासुद्धा हे मशीन सहज दिसून यावं. त्याला कोणी धडकू नये, म्हणूनच या मशीनला पिवळा रंग देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या कामगारांचे हेल्मेटदेखील पिवळ्या रंगाचे असतात.