लोकांच ऐकून नवऱ्याला I Love You म्हणन महिलेला चांगलच महागत पडलं Video

    0
    41

    व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला तिच्या हातामध्ये एक फूल घेत पतीला ‘आय लव्ह यू’ म्हणते. यावेळी तिथे आणखी एक महिला आणि व्हिडीओ शूट करणारे लोक उपस्थित असल्याचं दिसत आहे. सर्वांनी त्या महिलेला पतीला फूल देण्याचा आग्रह केल्याचंही व्हिडीओत ऐकू येत आहे. पण लोकांचे ऐकून पतीला प्रपोज करणं महिलेला चांगलच महागत पडल्याचं दिसत आहे. कारण महिलेने फूल देताच तिच्या नवऱ्याने तिला चापट मारल्याच दिसत आहे. परंतु हा सर्व व्हिडीओ गमंत म्हणून बनवल्याचं पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे नवऱ्याने चापट मारल्यानंतरही महिलेने हसत हसत पुन्हा आपल्या पतीला फुले देण्याचा प्रयत्न केला आहे. जे पाहून अनेकांनी या जोडप्याचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.