Wild life Tourism
जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना वाघ, सिंह, बिबट्या पाहायला मिळत असले तरी चित्ता पाहायला मिळण्याचं भाग्य फारच कमी असतं. पण नुकत्याच एका पर्यटकांच्या ग्रुपला चित्ता अगदी जवळून पाहायला मिळाला. चित्ता इतक्या जवळून पाहणं हे भाग्य म्हणावं की जीव मूठीत धरून गप्प बसावं, अशी काहीशी परिस्थिती यांच्या ओढवली होती. पण चित्ता मात्र शिकार किंवा आक्रमक पद्धतीच्या मूडमध्ये नव्हता. चित्ता एका जंगल सफारी करणाऱ्या जीपच्या मागील बाजूच्या स्टेपनीवर चढला. काही काळ त्याने तिथेच उभं राहणं पसंत केलं. पण त्यानंतर मात्र तो थेट एक मोठी उडी मारून जीपच्या टपावर जाऊन बसला.
Man in Wild ..#WildlifeTourism #AnimalBehaviour #Cheetah 🐆 @susantananda3 pic.twitter.com/QbQ223eiEJ
— Surender Mehra IFS (@surenmehra) July 2, 2022






