डर के आगे जीत है! चित्ता समोर उभा तरीही हरीण आरामात गवत खातोय… व्हिडिओ

0
24

एक हरीण फिरत फिरत चित्त्यासमोर जातं. चित्ता जाळीच्या पलीकडून असतो, चित्त्याला त्या हरणाकडे बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. हरीण त्याच्या जवळ जातं पुन्हा मागे येतं, इकडे तिकडे उड्या मारतं. हरणाला बघून चित्ता सुद्धा जवळ जायचा, त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो पण त्याला काय ते जमत नाही. कारण तो जाळीच्या पलीकडे असतो ना. हे सगळं बघून तुम्हाला सुद्धा विंडो शॉपिंग आठवेल. आपण आपल्या बजेट मध्ये बसणाऱ्या वस्तू तर नक्कीच विकत घेऊ शकतो पण जेव्हा गोष्टी बजेटच्या बाहेर असतात तेव्हा आपण सुद्धा पैशांची जुळवाजुळव करायचा खूप खूप प्रयत्न करतो पण ते काय आपल्याच्यानं शक्य होत नाही. आता असंच सेम टू सेम चित्त्याचं होतंय.