Xiaomi
कमी किंमतीत 5 G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Xiaomi च्या शानदार हँडसेटवर जबरदस्त ऑफर उपलब्ध आहे. Xiaomi 11i या स्मार्टफोनला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ३० हजार रुपयांच्या या फोनला १० हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करण्याची तुम्हाला संधी आहे.
Xiaomi 11i 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर फक्त २४,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच, फोनवर ५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत अजून कमी होईल. Xiaomi 11i 5G ला खरेदी करण्यासाठी ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय ५०० रुपये अतिरिक्त सूट मिळत आहे. शाओमीच्या फोनवर १३ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, ही ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास Xiaomi 11i 5G स्मार्टफोनला तुम्ही फक्त ९,४९९ रुपयात खरेदी करू शकता.