ती पुन्हा येणार… काय तो जमाना, काय त्या बाईकवर फिरण्याची मजा!

0
2409

मुंबई : यामाहा (Yamaha RX100) कमबॅक असं म्हटलं तर अनेकांना आनंद झाला असेल ना. ती जुनी लोकप्रिय बाईक , काय तो जमाना, काय त्या बाईकवर फिरण्याची मजा, हे सगळं आता पुन्हा अनुभवता येणार आहे. आता यामाहा आपल्या जुन्या लोकप्रिय बाईक्सपैकी एक लाँच करणार आहे. ही बाईक 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक होती आणि आता कंपनीनं या बाईकच्या परतण्याची घोषणा केली आहे. Yamaha RX 100 कंपनीनं 1985 मध्ये लाँच केले होते आणि 1996 मध्ये त्याचे उत्पादन थांबवले होते. आता कंपनी पुन्हा एकदा ही मोटरसायकल लाँच करणार आहे.
जुन्या मॉडेलप्रमाणेच नवीन मॉडेल्समध्येही अशाच प्रकारच्या सीट्स पाहायला मिळतील. पण, यावेळी ते अलॉय व्हीलसह येतील. ही बाईक परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये येणार आहे. कंपनी 2025 आणि 2026 या वर्षात काही नवीन उत्पादनं लाँच करू शकते