सोशल मीडियावर अनेक जण लावणी सादर करताना दिसतात. हल्ली पुरुष मंडळी सुद्धा लावणी सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण खूप सुंदर लावणी सादर करताना दिसतो. त्याची लावणी नृत्य पाहून तुम्हीही भारावून जाल. तो एका कॉलेजच्या कार्यक्रमात लावणी सादर करताना दिसतो
या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की मुंबई येथील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाला ६० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा तरुण नृत्य सादर करताना दिसतो. त्याने कुर्ती आणि धोती पॅन्ट घातली आहे. पिरतीच्या झुल्यात झुलवा या लोकप्रिय लावणी गीतावर हा तरुण नृत्य करत आहे. लावणी सादर करताना तो गीताच्या प्रत्येक लिरिक्सवर अनोख्या स्टेप्स आणि चेहऱ्यावर सुंदर हावभाव दाखवताना दिसतो. त्याच्या लावणी स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. तो इतका सुंदर डान्स करताना दिसतो की एखादी लावणी नटीही त्याच्यापुढे मागे राहील. त्याच्या प्रत्येक स्टेपवर कॉलेजमधील विद्यार्थी टाळ्या वाजवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video : तरुणासमोर मुली होतील फेल! सादर केली अप्रतिम लावणी चेहऱ्यावरील हावभाव..