या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात दोन भाऊ आहेत. त्यातील एक जण ट्रॅक्टरमध्ये बसलेला आहे तर दुसरा ट्रॅक्टर अडवत समोर उभा आहे. या व्हिडीओत हे दोघे भाऊ एकमेकांना विरोध करताना दिसत आहेत. ट्रॅक्टरमध्ये बसलेला भाऊ खाली उभ्या असणाऱ्या भावाच्या अंगावर अक्षरश: ट्रॅक्टर घालत आहे. यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, मात्र तरीही ते दोघेही एकत नाहीत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं तर हा वाद शेतीच्या कारणावरुन झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे, की एक भाऊ दुसऱ्या भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालायलाही मागे पुढे बघत नाही.
पाहा व्हिडीओ
https://www.facebook.com/reel/269830612217932