राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार याचा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
जय पवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये उर्वशी आणि जय यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.






