अधिसूचना जारी…महाराष्ट्रात सीएनजी स्वस्त!

0
901

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवरच्या व्हॅटमध्ये घट करण्याची घोषणा केली होती. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) 13.5 टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यात आला आहे. दिनांक एक एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. सीएनजी स्वस्त होणार असल्याने याचा मोठा फायदा हा ऑटो रिक्षा चालकांसह प्रवासी वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना आणि नागरिकांना होणार आहे.