नगर – जालना येथे जाहीर सभेत नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह बेताल व्यक्तव्य करुन समाजाचा अपमान करणार्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घावा, त्याचप्रमाणे आठ दिवसात समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी जिल्हा नाभिक महामंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष माऊली गायकवाड, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे, कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, सचिव बापुसाहेब औटी, मुरलीधर मगर, बाबुराव दळवी, रघुनाथ औटी, संतोष जाधव, पांडूरंग शिंदे, अक्षय कलंके, रमेश बिडवे, संतोष भालेराव, प्रदीप पवार, योगेश पिंपळे, अविनाश जाधव, बाळासाहेब खंडागळे आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राजकीय भाषणे देतांना बहुजन समाजाला उद्देशून भाषणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावनीच्या जहागिर नाहीत, असे असतांना तीन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी अशीच वक्तव्य केली होती. आणि आता केंद्रीय मंत्री दानवे यांनी समाजाला बदनाम केले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. दानवेंनी जाहीर माफी मागावी. जर आठ दिवसात माफी मागितली नाही तर जालना येथे दानवेंच्या निवासस्थाना समोर राज्यातील नाभिक समाज एकत्रित येऊन मुंडन आंदोलन करुन हे केस दानवेंना दान करु, असे निवेदनात म्हटले आहे.