मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील बदलांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात येत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 7 दिवसात 6 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं आज पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटर वाढवले आहेत. 22 मार्च पासून 28 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत.






