हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन करणार मुकुंदनगर मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार
आमदार संग्राम जगताप यांचा प्रेरणादायी निर्णय
अहमदनगर प्रतिनिधी ; – अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागातील मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम लवकरच हाती घेणार असून त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंद नगर भागातील मंदिरात जाऊन पाहणी केली यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, फारुख शेख अभिजित खोसे, समीर खान यांच्यासह मुकुंद नगर मधील नागरिक उपस्थित होते.
मुकुंदनगर हा भाग मुस्लिम बहुल वस्ती असला तरी या ठिकाणी खूप वर्षांपूर्वीची गणपती विठ्ठल आणि महादेवाची तीन जुनी मंदिर आहेत मात्र या मंदिरांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी आज या ठिकाणी जाऊन पाहणी केली तसेच याठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरु करण्याचे तातडीचे आदेश दिले असून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी या भागातील नगरसेवक समद खान आणि फारुक शेख ,मा. नगरसेवक निखील वारे यांच्यासह मुकुंु नगर मधील मुस्लिम बांधवांची समन्वय साधून हिंदू मुस्लिम बांधवांच मंदिर सेवा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही समिती स्थापन झाल्यानंतर या मंदिरांचे जीर्णोद्धाराचे काम सुरु करणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.