‘उद्धवा विसर तुझे सरकार’…. सत्ता संघर्षात अखेर भाजपची एंट्री

0
964

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपास ५० समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरु आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून भाजपच्या गोटात शांतता आहे. वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता शिवसेना आणि मविआच्या संघर्षात उडी घेतली आहे. भाजपचा या बंडात हात नसल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. मात्र, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या ट्विटमुळं एकच खळबळ उडाली आहे. उद्धवा विसर तुझे सरकार…असं ट्विट करुन भातखळकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. त्यांच्या या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.