एन.सी.सी. कार्यालयाच्या जागेवर मनपाचे व्यापारी संकुल उभारावे

0
373

नगर – प्रभाग क्र. ६ मधील नगर-मनमाड रोडवर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेमध्ये गेल्या ३५ वर्षापुर्वी इमारत बांधलेली असुन सदरील इमारतीमध्ये एन.सी.सी. कार्यालय आहे.हा करारनामा १० वर्ष संपुष्टात आलेला आहे ही इमारत अत्यंत जुनी झालेली असल्यामुळे इमारतीची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. सदरील कार्यालयामध्ये काही ठिकाणी मोकाट जनावरे येवुन घाण करतात ही इमारत अचानकपणे कधीही पडुन मनुष्यहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाची जागा नगर-मनमाड रोडलगत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे सदरील जागेवर महानगरपालिकेने व्यापारी संकुल बांधल्यास सावेडी उपनगरातील बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध होवुन महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यास मदत होईल तसेच नगर शहराच्या सौंदर्यात भर पडेल.तरी प्रभाग क्रमांक ६ मधील नगर-मनमाड रोडवरील एन.सी.सी. कार्यालयाच्या जागेवर व्यापारी संकुल उभारणेबाबत संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावे अशी मागणी ताई समिती स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी केली आहे.