*”काष्टी” करंडक २०२२ ला “जल्लोष” पूर्ण सुरुवात*

0
167

*”काष्टी” करंडक २०२२ ला “जल्लोष” पूर्ण सुरुवात*

काष्टी :- श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही “काष्टी करंडक” २०२२ चा जल्लोष पूर्ण उद्घाटन समारंभ श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनरावजी पाचपुते व राकेश पाचपुते यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार पाचपुते यांनी काष्टी करंडक हे खेळाडूंना दिशा देण्याचं व घडविण्याच काम करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच राकेश पाचपुते यांनी तरुणांनी अभ्यासा बरोबर खेळाकडे लक्ष देण्यास सांगून पुढील सामान्यांसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीप्रमाणे यंदाही काष्टी करंडक २०२२ गाव वाईज भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन काष्टी करंडक कमिटीने केले. यावेळी तब्बल ८० संघांनी सहभाग नोंदविला आहे.
यंदा या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर झाली आहेत यामध्ये प्रथम पारितोषिक १,११,१११ (बापू माने, इम्रान शेख), द्वितीय बक्षीस ५५,५५५ (दत्ता जगताप, इंजि. स्वप्नील भुजबळ), तृतीय बक्षीस ३३,३३३ (दादासाहेब लक्ष्मणराव नलगे यांच्या स्मरणार्थ), चतुर्थ बक्षीस २२,२२२ (गणेश भागडे, कपिल काकुळते), ग्राउंड सौजन्य राकेश पाचपुते, युट्युब सौजन्य महेश जाधव, बंडू जगताप, विशेष सौजन्य सुनील दरेकर, ट्रॉफी सौजन्य बापू माने, संजय काळे, विशेष सहकार्य अनिल पाचपुते, लालासाहेब फाळके, सुनील माने, आदेश नागवडे, नितीन चौरे, महेश्वर पतसंस्था, साईसेवा पतसंस्था, भाऊसाहेब वाडगे, बबनराव राहिंज, राजेंद्र पाचपुते, अनिकेत भोसले, गणेश डोईफोडे, राहुल जगताप,ऋषिकेश गायकवाड, विजयसिंह गुंड, सिद्धिविनायक ऍग्रो, प्रतीक पाचपुते, एच यु गुगळे, जगदंबा हॉटेल, मंदार मोरे, आम्रपाली हॉटेल, शिवाजीराव गायकवाड, ओमसाई ऍग्रो सर्विसेस, नितीन पाचपुते, त्रिमूर्ती भेळ सेंटर, कोकाटे हॉस्पिटल यांनी केले
उद्घाटन प्रसंगी लक्ष्मणराव नलगे, नवनाथ राहिंज, उत्तम मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजक कमिटी सदस्य प्रशांत पाचपुते, नाना साठे, सुनील चेअरमन पाचपुते, प्रा.सागर पाचपुते, विकी कांबळे,भाऊसाहेब जाधव, अतुल जठार, राहुल कुरुमकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.