Saturday, May 18, 2024

तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार…’या’ गावाचा एकमुखी निर्णय

नगर : पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावाचा करंजी महसूल मंडळात समावेश करण्यात यावा अन्यथा येणार्‍या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी निवेदन निवडुंगे ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे.तसेच निवडुंगे ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एकमताने ठरावही मंजूर केला आहे.

याबाबत निवडुंगे गावच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निवडुंगे गावातील ग्रामस्थांना,शेतकर्‍यांना करंजी व तिसगाव ही गावे प्रशासकीय दृष्ट्या सोयीची आहेत. निवडुंगे गावाचा कृषी विभागासाठी तिसगाव मंडलमध्ये तर महसूल मंडळासाठी पाथर्डीत समावेश आहे.गावाचा पाथर्डी महसूल मंडळात समावेश करण्यात आल्यापासून पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. अशा प्रकारे इतर अनेक प्रशासकीय कामकाजासाठी निवडुंगे ग्रामस्थांना अडचणीस तोंड द्यावे लागत आहे.

निवेदनावर आसाराम ससे,विठ्ठल कोलते,रावसाहेब मरकड,उद्धव ससे,रखमाजी मरकड,माणिक सावंत,हरिश्चंद्र मरकड,वैभव देशमुख,संदीप मरकड,नवनाथ कोलते,अशोक मरकड,चंद्रकांत मरकड,उद्धव नाना ससे, विठ्ठल मरकड,आदिनाथ मरकड,आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles