Monday, May 20, 2024

केंद्रीय मंत्री नारायण राणे ट्रोल, मुंबई विमानतळावरील व्हिडीओ

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. ऑपरेशन गंगा नावाने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. मात्र आता याच मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी असा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. केंद्रातील मंत्री सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामांबद्दल बोलताना दिसत आहेत. मात्र असच एक स्पष्टीकरण देताना केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी युक्रेनमधील परिस्थिती सांगताना देशाचं नाव चुकीचं घेतल्याने त्यांना ट्रोल केलं जात आहे. नारायण राणेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नारायण राणे काल मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर हजर होते. रुमानियाची राजधानी बुकुरॅस्त येथून हे विमान १८२ भारतीयांना घेऊन मुंबईत दाखल झालं होतं. मात्र या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या नारायण राणेंना वृत्तसंस्थेशी बोलताना या देशाचं आणि त्याच्या राजधानीचं नावं नीट घेता आलं नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles