खरी शिवसेना, धनुष्यबाण कोणाचं? निवडणूक आयोगाने सांगितले ‘निकष’

0
1785

सर्वोच्च न्यायालयाने ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, असा प्रश्न पडला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अथवा चिन्हावरती निर्णय देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. शिवसेनेच्या बाबतीत ‘बहुमताच्या आधारे’ चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर यावरती कारवाई करू,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.