संभाव्य धोका ओळखून खारे कर्जुने सोसायटी बिनविरोध…. प्रत्यक्षात पाच उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले गटासोबत
नगर तालुक्यातील सोसायटी निवडणुकांमध्ये उत्तरोत्तर रंग भरत चालला आहे तालुक्यातील बहुतांश सोसायट्या माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या गटाच्या ताब्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे कर्डिले गटाच्या विजयी वेगाचा विरोधकांनी धसका घेतला आहे त्यामुळेच भल्याभल्यांनी सोयीस्कर मार्ग पत्करून नामुष्की टाळण्याचे ठरवलेले दिसते
याचाच प्रत्यय खारेकर्जुने विकास सोसायटी च्या निवडणुकीत दिसून आला
जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्यासमोर खरेदी-विक्री संघाचे संचालक अंबादास शेळके यांच्या गटाने कडवे आव्हान उभे केले होते त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना स्वगृही कलह टाळणे अनिवार्य होते त्यामुळे त्यांनी अंबादास शेळके यांच्या गटाला पाच जागा देत निवडणूक बिनविरोध करून घेतली.
अंबादास शेळके माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या पाच नवनिर्वाचित संचालकांसह माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे आशीर्वाद घेतले.
माजी मंत्री कर्डिले साहेबांनी नवनिर्वाचित संचालक बाळासाहेब निमसे ,भाऊसाहेब महांडुळे, मच्छिंद्र कोळपे, गणेश पानसंबळ, सुनिता निमसे यांचा सन्मान केला.
यावेळी अंबादास शेळके, सबाजी पानसंबळ, कैलास लांडे, रशीद सय्यद, विलास पानसंबळ यांचाही सत्कार केला. व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजय निमसे, काका लांडे, नामदेव बोरुडे, दादासाहेब पळसकर, अजित तांबे ,अजित निमसे, लहानु बोरुडे ,बाबाजी निमसे, साहेबराव तांबे ,सतीश शेळके, सागर पळसकर, विलास निमसे उपस्थित होते.