जिल्ह्यात विखेंना धक्का.. बँकेचे संचालक यांनी बांधले हातात घड्याळ
प्रतिनिधी नासीर पठाण- विखे गटाचे निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व मार्केट कमिटीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांचा समर्थकांसह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व त्यांचे बंधु कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधिर राळेभात
यांनी नुकताच पुणे येथील साखर संकुल या ठिकाणी आज दि ५ मार्च रोजी दुपारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत नुकतेच हतात घड्याळ बांधले. त्यामुळे हा भाजपला एक प्रकारचा धक्काच म्हणावा लागेल.